तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

दार उघड उध्दवा दार उघड, हर हर महादेव घोषणेने परिसर दणाणला


भाजपच्या घंटानाद आंदोलनास परळीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
लवकर मंदिरे उघडे करा नसता तीव्र आंदोलनाचा इशारा- सतीश मुंडे, जुगलकिशोर लोहिया
परळी वैजनाथ, दि. 29.... दार उघड उध्दवा दार उघड, हर हर महादेव, उध्दवा कारभारचं धुंदच दार उघड उध्दवा दार उघड.... अशा घोषणांनी वैद्यनाथ मंदिर परिसर दणाणुन गेला होता. लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे व भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा मा.खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांंच्या नेतृत्वाखाली बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या प्रांगणात आज (दि.29) रोजी भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करुन सकाळी 11 वा. करण्यात आले. या आंदोलनास परळीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. तेंव्हापासून सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र पुनश्च हरीओम नंतर विविध क्षेत्रात सुट देण्यात आली. अनेक व्यवसाय दुकाने, वाहने, कारखाने सर्वच सुरळीत सुरू करण्यात आली. मात्र राज्यातील देवस्थाने बंद का? असा सवाल भाजपच्या वतीने उपस्थित केला आहे. राज्य सरकार दारुची दुकाने उघडी करु शकते मात्र लाखो भाविकांचे श्रध्दा, आराधना असलेल्या मंदिरांना मात्र ठाकरे सरकार उघडू शकत नाही असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. केंद्र सरकारने राज्यातील मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे पण महाराष्ट्र सरकार मंदिरे खुली करण्यास तयार नाही असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात  यावीत व भाविक, भक्तांच्या आस्थेचा, श्रध्देचा विचार करून राज्यातील सर्वच देवस्थान उघडण्यात यावीत अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. जर मंदिरे उघडी नाहीत तर येणार्‍या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परळी भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. अशा आशयाचे निवेनद उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांना देण्यात आले आहे.
यावेळी राजेश देशमुख, माऊली फड, डॉ. शालिनी कराड, निळकंठ चाटे,  नितीन ढाकणे,  प्रा. पवन मुंडे, उत्तम माने, रवि कांदे, राजेश गित्ते, अरुण अर्धापुरे, सुरेश माने, नितीन समशेट्टी, बळीराम गडदे, राजेंद्र ओझा, उमेश खाडे, नरसिंग सिरसाट,  धनराज कुरील, किरण धोंड, योगेश पांडकर, विजयकुमार खोसे, चंद्रकांत देवकते, नरेश पिंपळे, शाम गित्ते, राम गित्ते, गोपी कांगणे, महादेव गित्ते, अविनाश जोशी, विजय दहिवाळ, आश्विन मोगरकर, महादेव ईटके, दिलीप नेहरकर, सारिका कुरील, अभिजीत गुट्टे, बाळु फुले, बंडू कोरे, वसंत गडेकर, किशोर गित्ते, संजय मुंडे, भुराज बदने, सतीश मुंडे, रशिदभाई पानवाले, राम गित्ते, गोविंद चौरे, सुशिल हरंगुळे, वैजनाथ रेकने, श्रीपाद शिंदे, गोविंद मोहेकर, सुभाष कांबळे, राजेंद्र दगडगुंडे,  नितीन मुंडे, सोमनाथ स्वामी, विशाल मुंडे, नितीन राजुरकर, उमाकांत स्वामी यांच्यासह भाजप, भाजप युवा मोर्चा, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध सेवा सोसायटीचे पदाधिकारी, सरपंच, बँकांचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य आदींसह परळीकर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a comment