तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

माजीमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत श्रीगणेशाची पुजा करण्याचा मान गंगाखेडचे डॉ.आ.रत्नाकरराव गुट्टे यांना मिळाला


पुन्हा एकदा फडणवीस सरकार येऊ दे बप्पा

गुट्टे यांनी बप्पा समोर देशाच्या हितासाठी केली प्रार्थना,

  
आरूणा शर्मा


पालम :- जागतिक स्तरावर आलेल्या संकटानं महाराष्ट्रालाही कवेत घेतलंय. या संकटापासून महाराष्ट्रातील जनतेची सुटका व्हावी, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, सध्या राज्यावर असलेलं संकट टळावं आणि राज्यात जनतेच्या मनातील राज्ययावं असं साकडं गणपतीबप्पांकडे गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांनी साकडे घातलंय. माजीमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी बसविलेल्या श्री गणेशाची देवेंद्रजी फडणीस यांच्या समवेत पुजा करण्याचा मान डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांना मिळाला.गुट्टे यांनी प्रसंगी मतदारसंघ, राज्य आणि देशाच्या हितासाठी बप्पाला प्रार्थना केलीय. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी सुखी होवू दे,कारोनापासून नागरिकांना मुक्ती दे,कार्यकुशल देवेंद्रजी फडणवीस यांना पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होवू दे अशीच प्रार्थना डॉ. गुट्टे यांनी केलीय.

No comments:

Post a comment