तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 19 August 2020

गणेशोत्सव काळात डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम लावण्यास मनाई

वाशिम, दि. १९ (फुलचंद भगत) : डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम ह्या व्यक्तीच्या आरोग्य आणि स्वास्थ्यास अंत्यत घटक ठरू शकतात. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश देवून ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम २००० तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमन १९८६ मधील तरतुदीनुसार ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण करण्यासाठी आदेश पारित केले आहेत. पोलीस प्रशासनाला या आदेशांचे पालन करणे शक्य व्हावे, तसेच कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ (१) नुसार २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२० या काळात संपूर्ण वाशिम जिल्ह्यात डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार संपूर्ण श्रीगणेशोत्सव काळात, २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२० रोजी गणेश विसर्जन संपेपर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये कोणत्याही डॉल्बी मालक, डॉल्बीधारक, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांच्याकडील डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम उपयोगात आणू नये. तसेच सदर डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम व यंत्रसामुग्री सीलबंद ठेवण्याचे आदेश याद्वारे देण्यात आले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, मंडळाचे पदाधिकारी यांच्या विरुद्ध पोलीस विभागाकडून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment