तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 19 August 2020

नियमाचे काटेकोरपणे पालन कराउपविभागीय अधिकारी सुधीर पाटील


पालम येथिल शांतता समितीच्या बैठकीत केले प्रतिपादन


आरूणा शर्मा


 पालम :- गणेशोत्सव दरम्यान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे प्रतिपादन गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दि.19 रोजी दुपारी अकरा वाजता गजानन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठक प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी तहसीलदार ज्योती चव्हाण, गटविकास अधिकारी धस, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लोमटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, जालिंदर हत्तीअंबिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वंसतराव सिरस्कर, कॉग्रेस तालुकाध्यक्ष गुलाबराव सिरस्कर, पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, प्रा.आनंदराव शिंदे अदि व्यास पिठावर उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संजय थिट्टे, रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे माधवराव गायकवाड, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मारोती नाईकवाडे, पुरोगामी पत्रकार संघाचे  तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, पावर आँफ मिडीया तालुका अध्यक्ष शांतीलाल शर्मा, माजी उपनगराध्यक्ष आसदखान पठाण, नगरसेवक लालखा पठाण, सलमानखान मित्रमडळाचे संस्थापक अध्यक्ष सलमानखान पठाण, गणेशराव घोरपडे, पांडुरंग रोकडे, गंगाधर सिरस्कर, गणेश हात्तीआबिरे, रामप्रसाद कदम, वैजनाथ हात्तीअंबिरे आदी उपस्थित होते पुढे बोलताना पाटील म्हणाले की सर्वत्र वाढत असलेला कोरोनाचा संसर्जन आजाराचा धोका लक्षात घेता गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गावात सार्वजनिक गणेश मंडळ बसविणे टाळावे यामुळे आलेल्या भक्तांना आजाराचा धोका होणार नाही अन्यथा रोग वाढू शकतो यामुळे शक्य तेवढे सार्वजनिक गणेश मंडळ बसवणे टाळून शासनाने दिलेल्या निकषांचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे असे प्रतिपादन सुधीर पाटील यांनी आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत प्रसंगी बोलताना व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, सचिन इंगेवाड, पीएसआय साने, जमादार मुडे, सावंत, डि.एच.बि. साठे आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पो.नि. दिपक शिंदे यांनी केले व आभार गटविकास अधिकारी धस यांनी मानले.

No comments:

Post a comment