तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 August 2020

साखरा गाव गेल्या चार दिवसा पासून अंधारात

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील गावठाणचे विद्यूत रोहित्र जाळल्याने गाव गेल्या चार दिवसा पासून अंधारात आहें ऑईल नसल्याचे कारणं सांगून नवीन रोहित्र देण्यात महावितरणच्या अधिकाऱ्या कडून टाळाटाळ केली जात आहें या समस्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहें साखरा गावात जळालेले रोहित्र त्वरित नवीन रोहित्र देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थां कडून केली जात आहें तशी मागणी हि गावकऱ्यानी वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली आहें मात्र रोहित्रासाठी ऑईल नसल्याचे कारणं समोर करून नवीन रोहित्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहें गेल्या चार दिवसा पासून नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहें   या मुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहें यामुळे ग्रामस्थांना रात्र अंधारात जागून काढावी लागत आहें व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखिल गंभीर बनला आहें तसेंच पिठाच्या गिरण्या देखिल बंद राहत आहेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन साखरा येथें लवकरात लवकर .नवीन रोहित्र बसवून द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहें 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

1 comment: