तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 August 2020

हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे.झालेल्या नुकसानीची आमदार तानाजी मुटकुळें यांनी केली बांधावर जाऊन पाहणी


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यातील सतत 14 दिवस पाऊस सुरू असल्यामुळे , लिंबाळा तांडा , शिंदेवाडी ,खैरखेडा ,पानंकनेरगाव ,वाढोना ,शेगांव  ,सावरखेडा,वाघजाळी , म्हाळशी व इतर गावातील सोयाबीन वर झालेल्या आंथेक्लोज या रोगामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन खूप मोट्या प्रमाणावर खराब होऊन खूप मोठे नुकसान झाले आहे मोठ्या यासंदर्भात कालच जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांना पत्राद्वारे लेखी माहिती दिली असून वरील सर्व गावातील तात्काळ शेतकऱ्याच्या सोयाबीन पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेबांना दिले व आज आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी स्वतः लिंबाळा ,तांडा , खैरखेडा ,शिंदेवाडी या गावच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे झालेले नुकसान बघितले व तहसीलदार ,तलाठी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी उपस्थित आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब, तालुका अध्यक्ष अशोकजी ठेंगल , जिल्हा सरचिटणीस शंकरराव बोरुडेजी , जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम गडदे तालुका संघटक सरचिटणीस श्रीरंग राठोड सरचिटणीस गजानन नायक गुलाबराव गडदे  व सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment