तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 20 August 2020

खा.प्रितमताई मुंडें यांनी केले देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन!


केज दि.२०-------------केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील दत्तात्रय उर्फ बाळासाहेब   बापुसाहेब देशमुख यांचे नुकतेच सर्पदंशाने निधन झाले होते. खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी  शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
         
आपल्या शेतातील जनावरांना गवत टाकतांना दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देशमुख यांना दि.२९ जुलै २०२० रोजी साप चावला होता.त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आसता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मयत घोषित केले होते.  या दु:खद प्रसंगी चिंचोलीमाळी येथील देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी खा.प्रितमताई मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले .

यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे जेष्ठ नेते रमेश आडसकर,अक्षयभैय्या मुंदडा, सुनीलआबा गलांडे,जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,तालुका अध्यक्ष भगवान केदार,सभापती पती विष्णू घुले,डॉ वासुदेव नेहरकर,सुरेंद्र तपसे,माजी सभापती संदीप पाटील,स्विय सहाय्यक राजेंद्र लोढा,सरपंच सुनील 
देशमुख,प्रकाश राऊत,दगडु दळवे,डॉ महेंद्र राऊत,अरुण काळे,दिलीप गायकवाड,रविंद्र गलांडे,पत्रकार मधुकर सिरसट,अनिल गलांडे,चंद्रकांत भुजबळ,अक्षय नखाते,राज काळे,अभिजीत यादव,विक्रम घुंबरे,अमोल जाधव,यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a comment