तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

सेलूत शुक्रवारपासून ऑनलाईन गणेशोत्सव व्याख्यानमाला

व्याख्यान, परिसंवाद, सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन

व्याख्यानमालेचे ५९ वे वर्ष

सेलू, दि.२४ ( प्रतिनिधी ) : कोविड-१९ मुळे यावर्षी येथील
चार दिवसीय ऑनलाईन
गणेशोत्सव व्याख्यानमालेस शुक्रवारपासून ( दि.२८ ) सुरूवात होत आहे. 

गणेशोत्सव काळात ज्वलंत सामाजिक विषयांवर लोकप्रबोधन व्हावे, या हेतूने दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. व्याख्यानमालेचे हे ५९ वे वर्ष आहे. यावर्षी व्याख्यानमालेत परिसंवाद, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवारी ( दि.२८ ) नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे हस्ते उद्घाटन होणार असून या दिवशी " माझ्या नजरेतून करोना " या विषयावर डॉ.वरुण नागोरी ( औरंगाबाद ) यांचे व्याख्यान आहे. मोहन बोराडे व अजित मंडलिक संयोजन करतील.

शनिवारी ( दि.२९ ) " लॉकडाऊन : माझा अनुभव " या विषयावर परिसंवाद आहे. अनुष्का हिवाळे ( विद्यार्थ्यिनी ), डॉ.सविता लोया ( गृहिणी ), निलेश बिनायके ( व्यापार, उद्योग ), संतोष कुलकर्णी ( शिक्षण, पत्रकारिता ) यांचा यात सहभाग असेल. संयोजन प्रणिता सोलापूरे व डॉ.प्रवीण जोग करत आहेत. 

रविवारी ( दि.३०) " राष्ट्रीय चेतनेचे स्फूल्लिंग : लोकमान्य टिळक "  या विषयावर प्रणव पटवारी ( माजलगाव ) यांचे व्याख्यान आहे. डॉ.गंगाधर गळगे व उपेंद्र बेल्लूरकर संयोजन करतील.

सोमवारी ( दि.३१ ) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सांगितिक अभिवादन करण्यात येणार आहे. स्थानिक गायक कलावंत वरद दलाल, निलेश दिशागत, गायत्री कुलकर्णी, सायली पांडव, सच्चिदानंद डाखोरे यांचा यात सहभाग आहे तसेच औरंगाबाद येथील मालिनी घन व वंदना घन यांचे सुगम गायन होणार आहे. गिरीश दीक्षित संगीत साथ करतील. सुरेश हिवाळे व डॉ.काशिनाथ पल्लेवाड संयोजन करत आहेत. 

फेसबुक पेजला लाईक करा

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ.विनायकराव कोठेकर व प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली
नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यानमाला होणार आहे. 
कोविड-१९ मुळे श्रोत्यांनी गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या फेसबुक पेजला लाईक करून सहभागी व्हावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी, सचिव गिरीश लोडाया, पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. 

यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, लता गिल्डा, डॉ.कल्पना कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रा.ए.डी.कुलकर्णी, किशोर जोशी, राजेश ढगे, बाबासाहेब हेलसकर, गणेश माळवे, चंद्रशेखर नावाडे, बाबासाहेब चारठाणकर, श्रीपाद कुलकर्णी, कल्याण पवार, भाऊराव झाल्टे, डी.डी.सोन्नेकर, संजय वाघ, सहचिटणीस रेवणअप्पा साळेगावकर, ललिता गिल्डा , रोहिणी कुलकर्णी, सुधाकर नरळदकर, दुर्गादास कुलकर्णी, शशिकांत देशपांडे, संघमित्रा कांबळे, ज्योती अग्रवाल, रवि मुळावेकर, शाम आढे, नारायणराव इक्कर, प्रा.नागेश कान्हेकर, रूपा काला, नीता बलदवा, शोभा ढवळे, प्रा.संजय पिंपळगावकर, सुभाष मोहकरे, भालचंद्र गांजापुरकर, गणेश माळवे व सदस्य पुढाकार घेत आहेत.

पूर्ण...

No comments:

Post a comment