तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 August 2020

महापुरूषावर बदनामीजनक वक्तव्य करणार्या पोलीसावर गुन्हा दाखल करून निलंबित करा.पालम तालुक्यातील संतप्त शिवप्रेमींची मागणी


पालम ची बाजार पेठ कडकडीत बंद
                                             
अरूणा शर्मा

पालम पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक जगन्नाथ काळे बॅच नंबर 1346 यांनी छञपती शिवाजी महाराज व माॅ जिजाऊ बद्दल अपशब्द  बोलल्याची ऑडीओ क्लिप प्रसारमाध्यमात व्हायरल झाल्यामुळे पालम शहरात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शेकडो  शिवप्रेमींनी आज बुधवारी मोर्चा काढत तहसीलदार पालम व पोलिस निरीक्षक पालम यांना निवेदन देऊन सदरील पोलीसावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर ओमकार सिरस्कर, गजानन रोकडे, कल्याण सिरस्कर, गंगाधर सिरस्कर, शरद सिरस्कर, अनिल सिरस्कर, भगवान सिरस्कर, नागेश रोकडे, विनायक पौळ (जवळेकर ), हनुमान रोकडे, व्यंकटेश रोकडे, विलास चव्हाण, विनोद घोरपडे, राजकुमार गडम, प्रमोद दुधाटे, गजानन देशमुख, विशाल रोकडे, रविकुमार सिरस्कर, प्रमोद दुधाटे,राज गोडसे, रोहीत एडके, शाम जाधव, बाळू शिदे, सुदाम घोरपडे यांच्या सहित अनेक शिवप्रेमींच्या सह्या निवेदनावर आहेत. संतप्त शिवप्रेमींनी बदनामीकारक वक्तव्य करणार्या व जातीय तेठ निर्माण करणार्या पोलीसाला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना करताच संपूर्ण बाजारपेठ स्वयंस्फुर्तीने काही वेळातच बंद झाली आहे.या मागणीचे निवेदन अनिल देशमुख गृहराज्यमंत्री महाराष्ट्र, विशेष पोलीस परिक्षत्र नांदेड, जिल्हाधिकारी दिपक मुंगळीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी पुर्णा, आदीना देण्यात आले

No comments:

Post a comment