तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

उजनी पंचायत समिती गणात भाजपला धक्का ना. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली उजनी, सौन्दना, खापरटोन गावचे सरपंच माजी सरपंच, सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)(दि. २२) ---- : परळी विधानसभा मतदारसंघातील उजनी पंचायत समिती या प्रतिष्ठेच्या  समजल्या गणात भाजपला धक्का बसला आहे. येथील उजनी, सौंदना, खापरटोन आदी गावातील सरपंच माजी सरपंच यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. 

ना. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात सौंदना येथील सरपंच सोपान फड, उजनीचे माजी सरपंच साहेबराव माने, सुतगिरणीचे संचालक खापरटोन येथील विजय चाटे, दत्तराव चाटे यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज ना. मुंडेंच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी न. प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रणजित चाचा लोमटे, पंचायत समिती सदस्य शिवहार भताने गुरुजी, उजनी सर्कल प्रमुख बालासाहेब कातकडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment