तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व गोदरेज कजुंमर प्रॉडक्ट्स यांच्या माध्यमातून एक हात मदतीचा


(मुंबई प्रतिनिधी)
करोना महामारीत कोव्हीड-19 च्या जागतिक महामारी दरम्यान गरजू नाट्यकर्मीना जीवनावश्यक अन्न - धान्याची मदत वाटप मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2020 ते 20 ऑगस्ट 2020 रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे करण्यात आले. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ', मुंबई अध्यक्ष श्री.संतोष भरत काणेकर, आणि प्रमुख कार्यवाह.श्री.राहुल भंडारे मराठी कलाकार संघ, मुंबई अध्यक्ष.श्री.प्रदिप कबरे , तसेच रंगमंच कामगार संघ,मुंबई प्रवक्ते.श्री.रत्नकांत जगताप, श्री.विजय गोळे, श्री.संदिप नगरकर, श्री.प्रशांत मळगांवकर, श्री.अशोक डोईफोडे, श्री. विष्णू जाधव,श्री. अतिश कुंभार, श्री. महेश नाईक,श्री गजेंद्र वाणी, श्री विलास हुमणे, श्री. प्रभाकर वारसे, श्री. अमित शिर्के, श्री. अविनाश जाधव आणि व्यवस्थापक संघ,मुंबई अध्यक्ष. श्री. प्रभाकर (गोटया)सावंत,  प्रमुख कार्यवाह श्री. हरी पाटणकर, सदस्य श्री. नंदू पणशीकर, श्री. नितीन नाईक या सर्व प्रतिनिधींच्या हस्ते मदत वाटप करण्यात आले. सुमित गाडे आणि आशुतोष गोखले यांच्या  विशेष प्रयत्नाने या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केलेल्या या सामाजिक उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः या दोघांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून हे मदत वाटप शक्य झाले.  तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सी.एस.आर. हेड गोदरेज इंडस्ट्री:- गायत्री दिवेचा,जनरल मॅनेजर सागरिका बोस,(कंजूमर प्रॉडक्ट),मॅनेजर क्रिती महेश्वरी यांचे मनःपूर्वक आभार मानले.अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने दिली आहे.

No comments:

Post a comment