तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष धनराज गुट्टे यांचा परळीत सत्कार

 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य तथा अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष धनराज गुट्टे यांचा परळी येथे धावती भेट दिली असता त्यांचा पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.
        परळी शहरातील ईटके काँनर परिसरात धनराज विक्रम गुट्टे यांनी आज दि.29 आँगस्ट रोजी बीड कडे जात असतांना परळी येथे धावती भेटून मित्र मंडळीशी संवाद साधला. दरम्यान त्यांचा मित्र मंडळीच्या वतीने पुष्पगुच्छ देवून हृदय सत्कार करण्यात आला.यावेळी रामकृष्णन गित्ते, गणेश होळंबे, राहुल मिसाळ, बालाजी मुंडे व मित्र मंडळी आदींसहीत मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी बीड ग्रामीण तालुका अध्यक्ष पदी स्वप्नीलजी केकान खंडाळा यांची धनराज गुट्टे यांनी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच लवकरच होणाऱ्या महाज्योती आंदोलना संदर्भ विषयावर चर्चा करून संवाद साधला. घाई-गडबडीत का असेना पण सर्वांची विचारपूस करून नेहमीप्रमाणे आपुलकी व्यक्त करत धनराज गुट्टे यांनी सदिच्छा भेट दिली.

No comments:

Post a comment