तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 August 2020

रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम पाहून ग्रुपने अवयव दानासाठी पुढे यावे

- उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केली अपेक्षा


अरुणा शर्मा


पालम :- संचारबंदीच्या काळात कुठेही रक्तदान शिबिरे झाले नाही; परंतु आपले पालम, या व्हाट्सअप ग्रुपने रक्तदान शिबिर घेऊन एक आदर्श निर्माण करत सामाजिक बांधिलकी जपली. म्हणून या ग्रुपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आता त्यांनी अवयव दानासाठी पुढे येऊन संकल्प करावा, अशी अपेक्षा गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी बोलताना व्यक्त केले
   गणेशोत्सवानिमित्त पालम शहरात 30 ऑगस्ट रोजी आपले पालम व्हाट्सअप ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. व्यासपीठावर  ह.प भ. भागवताचार्य नारायण महाराज पालमकर, पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे, गट विकास अधिकारी एम.डी. धस, नगरपंचायत चे मुख्याधिकारी संतोष लोमटे, डॉ. बालाजी हिप्पर, डॉ. निलेश दळवे यांची उपस्थिती होती. 
     श्री. पाटील पुढे म्हणाले की, संचार बंदीमुळे रक्तदान सहसा होत नाही. म्हणून या ग्रुपने केलेल्या रक्तदान शिबिराचे मोल अधिक आहे.  अशा शिबिरातून झालेल्या रक्त संक्रमणामुळे अनेक रुग्णांचे आयुष्य उभा राहणार आहे त्यामुळे हे एक पुण्यकर्मच आहे. आता भविष्यातील गरज ओळखून या ग्रुपने अवयव दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कारण अवयव दानातून गरजवंतांचे आयुष्य उभा राहते. अवयव दाता मृत्यूनंतरही या जगात अवयव रूपातून जिवंत राहतो. म्हणून या ग्रुपने अवयवदानाची एक चळवळ उभा करावी, अशी अपेक्षा श्री पाटील यांनी व्यक्त केली. या शिबिरात युवकाने उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. म्हणून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. विशेषतः महिलांनीही सहभाग नोंदविला. एकूण 125 जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी आपले पालम ग्रुपचे एडमिन मारुती नाईकवाडे, गुलाबराव सिरस्कर, विलास चव्हाण, बाबाराव आवरगंड, रामप्रसाद कदम, राजकुमार गडम, आनंद साखला, शिवाजी शिंदे, भगवान सिरस्कर, राहुल गायकवाड, गजानन देशमुख, झेटींग पाटील, शंकर कनावार, डॉ. चेतन साखरकर, डॉ. महेश कोकाटे, संतोष लोमटे, शिवा रोकडे, रोहितकर आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment