तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 9 August 2020

साखरा हिवरखेडा धोतरा बोरखेडी परिसरात पावसाची पंधरा ते वीस दिवसा पासून उघडीप शेतकरी चिंतातूर


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा धोतरा बोरखेडि खडकी केलसूला यासह या भागातील आदी गावंामधे गेल्या पंधरा दिवसा पासून पावसाने उघडीप दिली आहें शेतकऱ्यांचे डोळे आत्ता आकाशकडे लागले आहें रानात मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत सध्या सोयाबीन पीक हे फुलाच्या अवस्थेत आहें त्यामुळे पावसाची अत्यंत गरज आहें पावसा अभावी पिके सुकून जाऊ लागली आहेत आणि फुले गळून जात आहेत साखरा परिसरात खरिपाची पिके चांगली असून पावसाने उघडीप दिल्या मुळे हळद कापूस सोयाबीन उडीद मूग अश्या अनेक पिकांना पावसाची अत्यंत गरज आहें दोन ते तीन दिवसात पाऊस जर नाही आला तर सोयाबीन हे पीक हातचे जाण्याची शक्यता आहें सध्या सोयाबीन पीक जोमात आले आहें फुलाच्या अवस्थेत असल्यामुळे आत्ता पर्यंत सर्वच पिके जोमात आहेत शेतकऱ्यांनी शेतीला भरपूर पैसा लावला आहें मशागत केली आहें सध्या सोयाबीन वर शेंडे अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी कीटक नाशकच्या दोन फवारऱ्या केल्या आहेत परंतु पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील पिके पावसा अभावी सुकून जात आहेत पाऊस लवकर जर नाही आला तर पिकांचे काय होणार हि चिंता शेतकरी वर्गाला लागली आहें सेनगाव मधे गेल्या दोन दिवसा पुर्वी चांगला पाऊस जाला होता मात्र साखरा हिवरखेडा बोरखेडी खडकी यासह या भागातील आदी गावामध्ये पाऊसाने उघडीप दिली आहें त्यामुळे आत्ता पूर्ण सोयाबीन वाळून गेल्या आहेत तरी प्रशासनाने साखरा मंडळतील हिवरखेडा धोतरा खडकी बोरखेडि केलसूला या भागातील पंचनामे करून या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहें 

प्रतिक्रिया 
साखरा मंडळातील हिवरखेडा बोरखेडि धोतरा खडकी या सह या भागातील आदी गावामध्ये गेल्या 20 दिवसा पासून पावसाने उघडीप दिल्या मुळे जमिनीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत सोयाबीन हे पीक वाळून जात आहें तरी प्रशासनाने या भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी

शेतकरी शरद  उद्धवराव निरगुडे मु .हिवरखेडा .ता सेनगाव .जिल्हा हिंगोली 

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment