तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 8 August 2020

ज ना चोपडे व पदमाताई वि. झाडोकार यांच्या स्मृती पित्यर्थ वृक्षरोपन ! नागरिकांनी घेतली वृक्षसर्वधनाची जबाबदारी

संग्रामपुर [ प्रतिनिधी] वृक्षतोड मुळे संतुलन बिघडल वातावरणात बदल होत आहे आपण निसर्गाची अकृपा म्हणुन निसर्गाला दोष देतो  वृक्षाची दिवसेन दिवस होत असलेल्या घट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतांना मात्र नागरिकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे वृक्षरोपण करणे सोपे परंतु त्याला लहानचे मोठे करणे अवघड परंतु नागरिकांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतल्याने वृक्षरोपनाचे फलीत  सहकार नेते जनार्दन नारायण चोपडे यांचा चौथा स्मृति दिन तसेच पदमाबाई विश्वनाथ झाडोकार यांच्या स्मृती दिन त्यानिमित्त अकोला येथील ओम हॉस्पीटलचे संचालक डॉ प्रविण पाटील यांनी समाजसेवेचा पिंड सांभाळताना वृक्षारोपण केले लोकनेते ज ना चोपडे व पदमाताई विश्वनाथ झाडोकार स्वर्गवासी झाले त्यांच्या आठवणीतून त्यांच्या नावाने वानखेड फाटा येथील बाल शिवाजी इंग्लीश स्कुल प्रांगणात व  नेकनापुर येथे घरो घरी वृक्षारोपण करण्यात आले व त्यांना ट्री गार्ड बसवण्यात आले व त्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधीत नागरिकांनी घेण्याचे आव्हाण ओम हॉस्पीटलचे संचालक डॉ प्रविण पाटील (चोपडे) यांनी केले  नेकनामपुर वासियांनी वृक्ष संर्वधनाची जबाबदारी घेतल्याने डॉ प्रविण पाटील यांनी नेकनामपुर ग्रामस्थांचे कौतुक केले यावेळी बाल शिवाजी इंग्लीश स्कुलचे मुख्यध्यापक शिक्षक व लोकनेते स्वर्गीय ज ना चोपडे मित्र मंडळ नेकनामपुर ग्रामस्थ होते

No comments:

Post a comment