तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

सततच्या पावसाने पाथरीतालुक्यात मुगाचे पीक शेतक-यांच्या हातचे गेले;पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-आस्मानी संकटांची मालिका शेतक-यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. पाचसहा वर्ष कोरड्या दुष्काळात दुबार तिबार पेरणी करून ही खरीप,रब्बी पिके हातात आली नाहीत. या वर्षी जुन ला मृगात पेरणी झाली चांगली पिके येतील अशी आशा लागुन राहीली मात्र सतत पाऊस लागुन राहिल्याने तोडनीला आलेल्या मुगाच्या शेंगांना तोडणी अभावी झाडावरच कोंब फुटले असल्याचे चित्र शेतशिवारात दिसत असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र गावागावात दिसत असून मुगाचे पंचनामे करून अर्थीक मदत देण्याची मागणी होत आहे.

या वर्षी आता पर्यंत सरासरीच्या १४१.७ टक्के पाऊस झाल्याने सुरूवातीला मुगाचे पीक चांगले येईल श्रावणातील सनवार भागतील अशी भाबडी आशा शेतकरी ठेऊन होते. मात्र या आशेवर वरुन राजाने वकृदृष्टी करत मुगाच्या एैन तोडनीच्या काळात सतत पडत राहील्याने मुगाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. 

या वर्षीच्या पावसाळ्यात सुरूवाती पासून पिकांच्या गरजे नुसार पडणारा पाऊस सरासरी पेक्षा जास्तच होता त्या मुळे मुगाचे पिक प्रचंड वाढले यात वारा आणि पाऊस यात हे पिक आडवे झाले तरीही पन्नास टक्के पिक हातात येईल अशी आशा वाटत असतांना लगेच धुई आली यात या पिकाचा फोलोरा गळाला त्या नंतर मागील आठ दहा दिवसां पासून सतत पाऊस सुरू असल्याने मुगाचे पिक शेतातच सडून गेले. "भागते चोर की लंगोटी सही" म्हणत काही शेतक-यांनी पडत्या पावसात मुगाच्या शेंगांची तोडणी केली खरी मात्र या ओल्या शेंगा जागे अभावी आणि वाळवण्या साठी सुर्यदेवताच नसल्याने मुग काळे पडले तर हवेतील आर्दत्रे मुळे येथेही मुगाच्या शेंगांना करे फुटले त्या मुळे हे पीक शेतक-यांच्या हातचे गेले आहे. 

मुगाच्या पिकाचा कालावधी पासष्ट दिवसांचा असतो. या पिका मुळे खरीपात केलेला खर्च काही अंशी वसुल होऊन पोळा,लक्ष्मी,गणेशोत्सव,गोकुळाष्टमी अशी सने भागवली जातता तर उधार उसनवारी ही काही अंशी भागऊन घरात तेलमीठ मिळते मात्र या वर्षी ही जादा पावसाने शेतक-यांच्या आशांवर पाणी फेरल्याचे चित्र दिसून येत आहे. आता हे शेत दुरुस्त करण्या साठी पैसा आणायचा कोठून हा प्रश्न शेतक-यां समोर आवासून उभा आहे.

अजून ही पाऊस पडतच आहे त्या मुळे नगदी पिक असलेल्या सोयाबीनच्या शेंगातही दाने भरणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत तर कपाशीला जादा पाऊस झाल्याने पाते आणि लहान बोंडे गळून पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

 मुगाच्या पिकांचे तालुका कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करून मुग उत्पादक शेतक-यांना अर्थीक मदत द्यावी अशी मागणी पाथरी तालुक्यातील शेतक-यां मधून होत आहे.

No comments:

Post a comment