तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 August 2020

मलकापूर ते परळी रोडवर ट्रक्टरचा विचित्र अपघात ; चालक जखमी


तालुक्यातील मौजे मलकापूर जवळील मलकापूर ते परळी रोडवरील इदगाह मैदान जवळ ट्रक्टरचा विचित्र अपघातात चालक जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार, दि.28 आँगस्ट रोजी सायंकाळीच्या सुमारास घडली आहे.
            शहरापासून जवळच असलेल्या मलकापूर ते परळी रोडवर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्टरचा अपघात झाला आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. या अपघात जीवीतहानी झाली नाही. हा रस्ता डोंगर चढूचा असल्यामुळे ट्रक्टर चढायला लागले की ट्रक्टरचे हेड मागील ट्रोलीवर आदळले. चालकाने उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक्टर रस्ताच्या बाजूला घेण्यात आले. या अपघातात ट्रक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

No comments:

Post a comment