तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

कंन्टेनमेंट झोनमध्ये रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यातबाबत मार्गदर्शक सूचना


बीड, दि. २३::-जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंन्टेनमेंट झोन मध्ये रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्याबाबत  सर्व रास्त भाव दुकानदार यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे 

संपूर्ण गाव कंन्टेनमेंट झोनमध्ये असेल तर रास्त भाव दुकानदार यांनी आवश्यक ती काळजी घेऊन गर्दी होणार नाही अशा मोकळ्या ठिकाणी (शाळा, मैदान) वाटप करावे.

शहरी भागांमध्ये ज्या ठिकाणी दिनांक 22 आॅगस्ट 2020 पासून संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे, त्यांनी तात्काळ वाटप सुरू करावे 

शहरामध्ये कंन्टेनमेंट झोन मधील दुकानांनी आतल्याआत छोटा हत्ती किंवा समकक्ष वाहनाने वाटप करावे 

बाहेरून कंन्टेनमेंट झोनमध्ये लाभार्थी येणार नाहीत  याची दुकान दार यांनी दक्षता घ्यावी.

राशन दुकान कन्ंटेनमेंट झोनच्या बाहेर असल्यास, कंटेनमेंट झोनमधील कुटुंबांचे धान्य कुटुंबनिहाय वेगवेगळ्या बॉक्समध्ये पॅक करून सदर बॉक्स कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना देण्यात यावेत.

रास्त भाव दुकानदार यांच्या कुटुंबा मध्ये किंवा त्यांच्या राहत्या घराच्या अगदी नजीक एक घर लागून जर कोणी कोरोना बाधित रुग्ण (पॉझिटिव पेशंट ) आढळल्यास दुकानदारांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी व नंतर वाटप करावे .

गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टन्स पाळले जाईल याची राशन दुकानदार यांनी पूर्णपणे काळजी घ्यावी. 

साबणाने किंवा सॅनिटाइजर ( sanitizer )ने
हात धुवून  मगच पाऊस( pos )मशीन वर अंगठा लावावा. 

सणासुदीचे दिवस असून कुणीही दुकान बंद ठेवू नये तसेच दिनाक 31 ऑगस्ट पर्यंत वाटप पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

 सर्व राशन दुकानदार यांनी नियमानुसार  वाटप करावे. याबाबत  सतत माहिती विचारणा करण्यात येत असल्याने सदर सूचना जिल्ह्यतील नायब तहसीलदार पुरवठा आणि रास्त भाव दुकानदार यांना करण्यात आल्या आहेत असे सचिन खाडे , जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी कळविले आहे. 
०००००

No comments:

Post a comment