तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद हिंगोली जिल्हा कार्यकरणी जाहीर.


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली- प्रतिनिधी. अखिल भागवत धर्म रक्षा परिषद चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष हभप माधवानंद महराज गीरी यांच्या व कार्य अध्यक्ष यांच्या संयुक्त विचाराने  हिंगोली जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार व गायनाचार्य महाराज मंडळीची परिषदेच्या  पदाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये हिंगोली जिल्हा अध्यक्ष भागवताचार्य श्री बाळकृष्ण महाराज गडदे, हिंगोली जिल्हा उपअध्यक्ष श्री दतराव महाराज कुंरूदेकर, हिंगोली जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी श्री संजयजी महाराज पडघान नवलगव्हानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर हिंगोली तालुका अध्यक्ष पदी धर्मयोद्धे हभप गणेश महाराज कुबडे हिंगोलकर, हिंगोली तालुका उपध्यक्ष श्री संतोष महाराज परंडे, हिंगोली तालुका सचीव पदी श्री संतोष महाराज निंबेकर हिंगोली तालुका संपर्क प्रमुख केशव महाराज टेकाळे तर कळमनुरी तालुकाध्यक्ष पदि हभप ज्ञानेश महाराज कळमनुरी तालुका उपाध्यक्ष पदी ओम महाराज निळकंठे सोडेगावकर तर कार्यकरणी मध्ये श्री मारोती म काळे, प्रमानंद म काळे महेशगव्हान कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भागवत धर्म रक्षा परिषद ही देव, देश, धर्म या संतांच्या तत्वावर धार्मिक आणो आध्यत्मिक कार्य करून येत्या काळात वारकऱ्यांच संघटन करून संतांचे, महापुरुषांचे विचार घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न करनार आहे असे हिंगोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हभप संजय महाराज नवलगव्हाणकर, जिल्हाप्रमुख हभप गडदे महाराज आणि धर्मयोद्धे हभप गणेश महाराज कुबडे हिंगोलीकर यांच्याकडून सांगण्यात आलेतेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment