तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

कृष्णा बदने यांचे अपघाती निधन


परळी (प्रतिनिधी)
  मालेवाडी येथील रहिवाशी कृष्णा भानुदास बदने यांना दि.28 आँगस्ट रोजी चांदापूर जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली होती.त्यांच्यावर लातूर येथे उपचार घेत असताना आज दि.29 रोजी निधन झाले.
       परळी व परिसरात भारुडकार म्हणुन प्रसिद्ध असलेले कृष्णा बदने वय 40 वर्षे हे आपल्या बहिणीकडे लेंडवाडी या गावी  जात असताना दि.28 रोजी अज्ञात वाहनाने त्यांच्या  मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता त्यांच्यावर लातुर येथे उपचार सुरु होते उपचार सुरु असताना आज दि.29 रोजी सकाळी त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले असा परिवार आहे.

No comments:

Post a comment