तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 August 2020

पाथरीत देशी,विदेशीच्या दुकानावर शोशल डिस्टंसिंगचा फज्जा;जादा दरानेही विक्री होत असल्याची तक्रारकिरण घुंबरे पाटील
पाथरी:-शहरात देशी, विदेशी दारू दुकानांवर तळीराम तोबा गर्दीकरत असून या मुळे  कोविड-१९ चा फैलाव वेगाने होण्याचा धोका निर्माण झाला असून दुकानदार अधिक चे पैसे घेत दारू विक्री करत असल्याची तक्रार परभणी जिल्हाधिकारी आणि  जिल्हाउत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदनाव्दारे मंगळवार ४ ऑगष्ट रोजी करण्यात आली आहे.
पाथरी शहरात देशी,विदेशी दारू विक्रीची दुकाने सेलू कॉर्णर परीसरात असून या ठिकानी दारू खरेदी साठी तळीराम सकाळ पासूनच सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवत तोबा गर्दी करत दारू खरेदी करत आहेत. दारू विक्री साठी प्रशासनाने नियम घालून दिले असतांना ही या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र खुलेआम पणे दिसून येते. यातच या दुकानदारां कडून प्रति कॉर्टर पंधरा ते विस रुपये आगाऊ घेतले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विजय प्रभाकरराव वाकडे यांनी परभणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या कडे निवेदना व्दारे केली आहे.जिल्ह्यात इतर शहरांच्या तुलनेत पाथरी शहर आणि तालुक्या कोव्हीड-१९ ची लागन कमी आहे. मात्र अशा प्रकारा मुळे या जिवघेण्या आजाराचे रुग्ण वाढू शकतात असे या निवेदनात म्हटले आहे. संबंधीतांची योग्यती चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी वाकडे यांनी निवेदनात केली आहे.

No comments:

Post a comment