तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 August 2020

सेनगांव शहरात भरपावसाळ्यात ही पाणीटंचाई...


(नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष)
हिंगोली/प्रतिनीधी

सेनगांव नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष इंजि.अभिजीतभाऊ देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सेनगांव शहरातील पाणीपुरवठा योजना मंजुर झाली व तत्कालीन युतीच्या सरकारने सुमारे १४ कोटी रुपये निधी देत सेनगांव शहरात येलदरी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन मंजुर करण्यात आली.परंतु महिन्यातुन चार ते पाच वेळेस पाईपलाईन कुठे तरी लीकेज झाली या कारणास्तव शहरातील पाणीपुरवठा आठ- आठ दिवस खंडीत होत असल्याने या योजनेतील पाईपलाईनचे काम निकृष्ठ झाल्याचे सुज्ञ नागरीकातुन बोलल्या जात आहे. 
सेनगांव नगरपंचायतने प्रत्येक कनेक्शनमागे ४ हजार रुपये वसूल केले शहरात हजारो नळकनेक्सन झाले असून नगरपंचायतने या माध्यमातून कोट्यावधी रुपये वसुल करुन ही सेनगांवकरांना पाणीपुरवठा सुरळीत नाही याबद्दल सेनगांवकर कमालीचे संतप्त आहेत. गेल्या दहा दिवसांपासून शहरात नळाला पाणी नाही विशेष म्हणजे महालक्ष्मी सणाच्या काळात. नगरपंचायत कडुन सांगितले जात आहे की पाणीपुरवठा करणारी मोटार जळाली आहे परंतु ही काही ग्रामपंचायत नाही नगरपंचायत ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी अतिरिक्त मोटार असायला हवी व तसे अतिरिक्त मोटार ठेवण्याचे शासकीय आदेश आहेत. सेनगांवकर म्हणतात पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईनच अंत्यत निकृष्ठ दर्जाची झाल्याने शहरात कुठे ही कधीही पाईपलाईन लिकेज झाल्याने महिन्यातून दहा दहा दिवस सेनगांववासीयांना नाहक पाणीटंचाई चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या येलदरी पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात आलेल्या पाईपलाईनची निपक्ष:पाती चौकशी व्हायला पाहिजे अशी सेनगांवातील सूज्ञ नागरीकातुन होत आहे.सेनगांव शहरात गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याचे तक्रारी नागरीकांतुन येत असल्याने सेनगांव नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदीप बहिरे यांच्याशी संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तर मिळाले.

No comments:

Post a comment