तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी राहुल लोणीकर यांची नियुक्ती

परतूर

आशिष धुमाळ

भाजपा युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी शुक्रवारी 21 आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी जाहिर केलेल्या कार्यकारिणीत जालना जिल्ह्यातील भाजपाचे युवकांचे नेतृत्व, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य राहुल बबनराव लोणीकर यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

      पक्ष संघटनेत अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सरचिटणीस पदावर राहुल लोणीकरांची वर्णी लागल्याने मराठवाड्यातील पक्ष संघटनावर लोणीकरांची पकड अधिक मजबुत होईल. मुख्यमंत्री चषक स्पर्धेत खेळाडूंची सर्वाधिक नोंदणी, सर्वाधिक सामन्याचे आयोजन, मराठवाडा स्तरावर रक्तदान शिबिरांचे आयोजन आदी पक्षाचे ठरवून दिलेल्या उपक्रमांमध्ये राहुल लोणीकरांनी सहभाग नोंदवून ते यशस्वी करून दाखविल्याचे बद्दल हे महत्वाचे पद त्यांना देण्याचे आल्याचे बोलले जात आहे.

राहुल लोणीकर यांच्या निवडी बद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार, भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनमताई महाजन, माजी मंत्री बबनराव लोणीकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील महाराष्ट्र प्रभारी संजय कोंडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

    राहुल लोणीकरांच्या नियुक्तीबद्दल परतूर मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्हात तसेच मराठवाड्यात ठिकठिकाणी फटाके फोडून भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव केला.

No comments:

Post a comment