तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 20 August 2020

इंदिरानगर वासी ठोकणार ग्राम पंचायत मध्ये मुक्काम!

डोणगांव येथील स्थानिक इंदिरा नगर मध्ये मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असून त्यात साचलेल्या पाण्याने चालता येत नाही व आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे.

  खड्डा भरून रस्ता सुरळीत करा अन्यथा आरोग्याचा विचार करता सरळ ग्राम पंचायत मध्ये मुक्काम ठोकण्या संबंधी निवेदन इंदिरानगर वासीयांनी दिले.

 डोणगांव ( जमील पठाण) 20

बुलढाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या डोणगांव मध्ये सध्या असुविधांचा भडिमार आहे गावातील कित्येक रस्त्याने चालता येत नाही तर मेन रोडवर पाण्याचे गटार साचलेले आहेत तर  येथील इंदिरा नगर मधील रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला ज्याने रस्त्याने चालणे कठीण झाले तर साचलेल्या पाण्याने रोगराई सुद्धा पसरण्याची भीती निर्माण झाली तेव्हा रस्ता सुरळीत करा अन्यथा ग्राम पंचायत मध्ये मक्कामी राहू या आशयाचे एक निवेदन २० ऑगस्ट रोजी इंदिरानगर वासीयांनी दिले.
    डोणगांव मधील मेण रोड ज्याने गावात जाण्याचा मुख्य मार्ग आहे मात्र याची कोणतीही दुरुस्ती झाली नाही तर दुसरीकडे इंदिरा नगर ते लक्ष्मी नगर हा सर्वात लांब रस्त्यावर बाबुराव राऊत यांच्या घरा समोरील भागात मोठा खड्डा निर्माण झाला सर्वात जास्त रहदारी असलेल्या या मार्गावर टोगल्या एवढे पाणी साचलेले राहते ज्यातून जाणे खूप अवघड होऊन गेलेले आहे तर दुसरीकडे पाणी साचल्याने मच्छर जन्य रोग वाढण्याची भीती आहे तेव्हा हा रस्त्या वरील डबके दुरुस्त करून डबक्यात साचलेले पाणी काढून टाका अन्यथा आम्ही ग्राम पंचायत मध्ये मुक्कामी राहू अश्या आशयाचे एक निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की साचलेल्या पाण्याने रोगराई पसरण्याची भीती आहे अश्यात जर रोगराई पसरलीतर लॉक डाऊन मळे आधीच काम नाही त्याने दवाखान्यात लावण्या साठी आमच्याकडे पैसे नाही अश्यात आमच्या समोर ग्राम पंचायत मध्ये मुक्कामी राहण्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही आम्ही सोशल डिस्टन्सचे पालन करून ग्राम पंचायत मध्ये मुक्कामी राहू व याची सर्व जवाबदारी ग्राम पंचायत प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद आहे यावर इंदिरा नगर वासीयांच्या साह्य आहेत.

No comments:

Post a comment