तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारीचा पणन कायद्या सह नियमनमुक्ती कायद्याचा निषेध करित एकदिवशीय संप यशस्वी

संग्रामपुर [ प्रतिनिधी] महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटना पुणे यांनी संयुक्तपणे पुकारलेल्या राज्यव्यापी बाजार समिती बंदमध्ये आज दि 21,शुक्रवारी संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे सहभागी होऊन एकदिवसीय संप यशस्वी केला.
समितीचे वरवट बकाल व सोनाळा येथील उपबाजारात आज शुक्रवारी शुकशुकाट होता.समितीमध्ये कोणत्याही प्रकारचे धान्य खरेदी विक्री झाली नाही. वरवट बकाल उपबाजार येथे मुख्य द्वार बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी नवीन पणन कायद्याचा निषेध व्यक्त केला.तसेच संग्रामपूर येथील बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे देत आंदोलनात सहभाग दर्शविला.बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासनसेवेत समाविष्ट करा,नियमनमुक्ती कायदा रद्द करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.आजच्या संपामध्ये बाजार समितीचे सचिव पंकज मारोडे,संदीप माटे, शिवशंकर खिरोडकार, सचिन टिकार, मंगेश गोतमारे, अनिल चंदनशिव,सुनंदाबाई बकाल आदी सहभागी झाले होते.

No comments:

Post a comment