तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

प्रवाशांच्या सोईसाठी शासनाने सुरु केल्या बसफेर्‍याप्रवाशांपेक्षा सध्या बसस्थानकांवर जनावरांची वर्दळ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेले पाच महिने बंद असलेली एसटी बससेवा राज्यसरकारने चालु केली आहे. परळी बसस्थानकातुन बाहेर गावी जाणार्‍या बसच्या फेर्‍या चालु झाल्या आहेत. नेहमी प्रवांशी नागरिकांनी परळीचे बसस्थानक गजबजलेले असते. परंतु कोरोनाच्या भीतीने अद्याप प्रवाशी बसस्थानकाकडे फिरकत नसल्याचे दिसत आहे. बसस्थानकात प्रवाशांपेक्षा जागोजागी जनावरेच थांबलेली दिसत आहेत.
परळी बसस्थानकातुन जिल्हा अंतर्गत व जिल्हा बाहेर नेहमीच बस सेवा आता सुरु झाली आहे. सोशल डिस्टसिंग व मास्क, सेनिटायझर वापरणे बंधनकारक असून या नियमांचे एसटी महामंडळ आणि प्रवांशी दोघांनाही पालन करणे आवश्यक आहे. यानियमानुसार सध्या बसमध्ये प्रवाशी घेतले जात आहेत. एकासिटवर एकच प्रवाशी प्रवास करु शकतो. परळी बस डेपोतून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आता बस फेर्‍या सुरु झाल्या आहेत.
दरम्यान कोरोनाची भिती अद्यापही जनतेच्या मनातुन गेलेली नाही. याचा प्रत्यय परळी बस आगारात दिसुन येत आहे. बस स्थानकात एसट्या उभ्या आहेत. परंतु प्रवांशाची संख्या तुरळक आहे. स्थानकातील प्रवाशांच्या सोईसाठी बांधण्यात आलेली बैठक असाने रिकामी दिसत आहेत. याऐवजी मोकाट फिरणारे जनावरांनी बसस्थानकात आपला मुक्काम ठोकला आहे. प्रवाशी नसल्याने त्यांनाही हटवणारे कोणी दिसत नाही. एसटी प्रवाश सुरु झाला आहे. परंतु एसटीला आता प्रवाशांच्या आगमनांची प्रतिक्षा आहे.

No comments:

Post a comment