तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

कै. राजाभाऊ कदम व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन संपन्न

-----------------------------------------------------------
सोनपेठ: येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.राजाभाऊ कदम व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जनजागरण मोहीम, शास्त्रीय दृष्टिकोन व इतर विषयावर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन व्हिडिओ मार्फत मत प्रदर्शन घेण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील ऊपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान साथरोग नियंत्रण जनजागरण मोहीम शास्त्रीय दृष्टिकोन दिवस व विविध उपक्रम राबवले जातात,व याचाच एक भाग म्हणून याहीवर्षी रोगनियंत्रणाच्या संदर्भात जनजागरण करणारे पीपीटी प्रेझेन्टेशन विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आले होते,तसेच कै. राजाभाऊ कदम व डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्याविषयी माहिती देणारे तसेच शास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्व आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर ही विद्यार्थ्यांनी आपले पीपीटी प्रदर्शन व्हिडिओ सानिया शेख, झेबा अन्सारी, रूपाली सौलाखे, परमेश्वर चव्हाण, प्रगती म्हस्के आदी विद्यार्थ्यांनी सादर केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. विकास रागोले, प्रा. डॉ सुनिता टेंगसे, प्रा. विशाल राठोड यांनी विशेष सहकार्य केले तर आभार प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ संतोष रणखांब यांनी मानले. अभिवादन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते.

No comments:

Post a comment