तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 9 August 2020

चोरवाघलगाव येथे कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकरी शेतीशाळा संपन्न

 
गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

चोरवाघलगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकरी शेतीशाळा होस्ट फार्मल मच्छिंद्र मोईन यांच्या शेतावर शेतकरी शेतीशाळा घेण्यात आली.यामध्ये शेतीशाळा समन्वयक विजय कासलीवाल यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना कामगंध सापळे कापूस पिकातील फवारणी ,खत व्यवस्थापन,याविषयी माहिती सांगण्यात आली. तसेच कृषि सहाय्यक डी.एस. कुचेकर यांनी  फवारणी करताना घ्यावयाची काळजी व उपाययोजना याविषयी माहिती सांगण्यात आली.नंतर भागोदय एरिगेटर्स चे दुकानदार श्रावन मोईन यांनी सिंचन संच सर्विसिंग मोहिमेची माहिती दिली. 

 यावेळी शेतीशाळा समन्वयक विजय कासलीवाल, कृषी सहाय्यक दिपक कुचेकर, समूह सहाय्यक स्वप्निल खैरनार ,शेतीशाळा प्रशिक्षक पंकज छानवाल, उपसरपंच रवींद्र मोईन ,प्रगतशील शेतकरी  मच्छिंद्र त्रिभुवन,अशोक दुशिग,विकास त्रिभुवन, दादा बुट्टे ,राजेंद्र मोईन, गोकुळ मोईन,भिवसेन मोईन,दादा मोईन,प्रदीप मोईन,श्रीकांत मोईन, श्रावन मोईन आदी शेतकरी  उपस्थित होते.

No comments:

Post a comment