तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 August 2020

प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना पालन केल्यास कोरोनावर मात करता येते - ऐश्वर्या गिरी

----------------------------------------
प्रा.डॉ. संतोष रणखांब, तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
 सोनपेठ : सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रशासन अथक परिश्रम करीत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर शर्तीचे प्रयत्न करत आहे, अशा प्रसंगी नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे योग्य रीतीने पालन केल्यास कोरोना साथीवर मात करता येते, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे, तरी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन परिविक्षाविधिन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी केले आहे. त्या उपचारासाठी दाखल असलेल्या सहाजणांनी कोवीडवर यशस्वी मात करुन आपल्या घरी परतले, त्यावेळी शुभेच्छा देऊन तेजन्यूज हेडलाइन्स च्या प्रतिनिधीशी बोलत होत्या.
सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती मध्ये कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. आधी या ठिकाणी फक्त विलगीकरण कक्ष होता व संशयित रुग्णांना येथे विलगीकरणासाठी ठेवण्यात येत होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गंभीर लक्षणे  नसलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना या ठिकाणी ठेवण्यात येत होते . या ठिकाणी आता पर्यंत दहा कोरोना बाधीत रुग्णांना ठेवण्यात आले होते. यातील सहा रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याची कोवीड चाचणी निगेटिव्ह झाल्यावर त्यांना रुग्णालयातुन दि.३० रोजी घरी सोडण्यात आले. कुरणा सात रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अतिशय सतर्क होऊन काम करत आहे.
या वेळी तालुका प्रशासनाच्या वतीने परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी सर्व रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी रुग्णालय अधिक्षक डॉ.सिध्देश्वर हालगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार,रवींद्र देशमुख, सुधीर बिंदू,  गणेश पाटील,डॉ. सचिन कस्पटे, डॉ. कपिल महाजन, मेनका लांडे,मिनल भदाडे,नेहा पवार, साईनाथ पांचाळ गृृृहरक्षक दलाचे विजय मस्के यांच्या सह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते . याप्रसंगी रुग्ण भावुक झाले होते, डॉक्टरांनी रुग्णांना घरी गेल्यावर काळजी घेण्या बाबत योग्य ते मार्गदर्शन केले.

No comments:

Post a comment