तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 19 August 2020

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांची मागणी


विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना लोणीकर यांचे पत्र

परतूर

आशिष धुमाळ


मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात अगोदरच शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे कंपनी आणि महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले परिणामी शेतकऱ्यांना एकदा-दोनदा तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली आहे असे असताना खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे शेतकऱ्यांनी या हंगामात घेतली जाणारी कापूस मूग उडीद सोयाबीन मका मिरची यासारखे अनेक पिके नष्ट झाली आहेत या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

मराठवाड्याचा महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाला आलेली फुले व कार्य पूर्णतः गळून पडले असून कापसाच्या उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येणार आहे त्याचबरोबर मूग या पिकाच्या शेंगा पूर्णपणे सरून गेल्या असून काही शेंगांना झाडावरच फुटलेले आहेत हीच अवस्था उडीद सोयाबीन मका या पिकांची देखील झालेली आपणास दिसून येईल मक्याचे पीक देखील पूर्णपणे भुईसपाट झालेले आहे परिणामी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांना होणार आहे असेही लोणीकर यांनी विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

सोयाबीन पिकाच्या बाबतीत शेतकरी अगोदर बियाणे कंपन्या शासनाचे बियाणे महामंडळ यांच्याकडून भरडला गेला असून बोगस सोयाबीन बियाणे मिळाल्यामुळे परभणी व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत अगोदर बोगस बियाणे मिळाले आणि आणि त्यानंतर दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी केल्यानंतर सोयाबीन चे पीक बऱ्यापैकी आलेले असताना अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाले आहे दोनदा किंवा तीनदा बियाण्यासाठी खर्च करावा लागला आहे त्यासोबत खताचा सुद्धा खर्च दुप्पट तर काही ठिकाणी तिप्पट झालेला आहे अशा परिस्थितीत उत्पन्न मात्र शून्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर संकटा मागून संकटे येत आहेत अशा परिस्थितीत राज्य सरकारने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे

विभागीय आयुक्त व सर्वच जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्यात तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश देऊन नुकसानीचा पंचनामा राज्य सरकारकडे तात्काळ पाठवा व हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जावा असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a comment