तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 August 2020

किडनी आजाराने ४५ वर्षीय होमगार्ड गजानन भिलंगे यांचा मुत्यू

संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील निवाणा येथील रहिवासी तामगाव पोलीस स्टेशन मध्ये गेल्या ८ वर्षा पासुन होमगार्ड पदावर कार्यरत आयु गजानन भिलंगे रा.निवाणा यांचे आज किडणीच्या आजाराने राहत्या घरी दुर्देवी निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ४५ वर्ष होते होमगार्ड भिलंगे यांना १ वर्षा पुर्वी किडनी आजाराची लागन झाल्याचे वैधकिय चाचणी  केल्यानंतर निष्पन्न झाले होते भिलंगे कुटुंबीयांनी अकोला येथील भगत व देशमुख या खाजगी रुग्णालयात किडनी आजारावर औषध उपचार वर मोठ्या प्रमाणात खर्च केले  वैधकिय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार मुंबई येथील के एम हास्पीटल येथे औषधउपचार सुरु होता आज अचानक प्रकृती बिघडल्या नंतर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापुर्वीच राहत्या घरी दुदैवी निधन झाले निवाणा बौद्ध स्मशान भुमित त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई ,भाऊ, पत्नी, ३ मुले आप्त परिवार आहे 
होमगार्ड गजानन भिलंगे मनमिळावु स्वभावचे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय होते त्यांचा किडनी आजाराने मुत्यू दुदैवी मुत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबांवर दु : खाचे डोंगर कोसळले असुन आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासनाने भिलंगे कुटुंबांना आर्थिक मदत करावी अशी मांगणी होमगार्ड युनियन सह ग्रामस्था कडून होत आहे

No comments:

Post a comment