तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 August 2020

कुटुंबाचा विचार करा.. गाफील राहून पत्रकारिता करू नका - वसंत मुंडे

सुभाष मुळे..
----------------
 गेवराई, दि. ३० _ स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून, पत्रकारांनी जागृत राहायलाच पाहिजे, त्याशिवाय आता पर्याय नाही. संकटे सांगून येतात का ? असा खडा सवाल उपस्थित करून , आपण गाफील राहील्याने आपले कुटुंब उघड्यावर पडते, याचा गांभीर्याने  विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी येथे बोलताना केले असल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी दिली.
    शनिवार, दि. 29 रोजी दुपारी दोन वाजता गेवराई येथील जेष्ठ पत्रकार स्व. संतोष भोसले यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार संतोष मानुरकर, मराठवाडा विभागाचे बीड जिल्हा अध्यक्ष वैभव स्वामी यांची उपस्थिती होती. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण स्वतः विषयी गाफील असतो. बातमीसाठी वेळ देणारे पत्रकार स्वतःला, कुटुंबाला का वेळ देत नाहीत  ? हा प्रश्न आहे. कुटुंब प्रमुख म्हणून, आपली जबाबदारी नीटपणे पार पाडण्यासाठी, समाजाला शिक्षण देणाऱ्या पत्रकारांनाच मार्गदर्शन करण्याची वेळ येते, तेव्हा मनाला वेदना होतात, अशी कबुली देऊन ते म्हणाले की, आयटी च्या दशकात आपण ही स्मार्ट व्हायला नको, किती वेळ हात पुढे करायचा. त्याला काही अर्थ आहे का, त्यापेक्षा सजग नागरिक म्हणून स्वतःच्या हिमतीवर उभे राहून, देणारे म्हणून आपली ओळख निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी, एकत्रीत या,  संवादातून पत्रकारांच्या आर्थिक विकासाचा मुद्दा निकाली निघू शकतो. अशक्य असे काही नाही. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. जे होताना दिसत नाहीत. ही खेदाची बाब आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना असंख्य अडचणी येतात, याचा मला ही अनुभव आहे. जाहीरात सोडता, आर्थिक सोर्स नसतो. जाहीरात मिळाली की, आपणाला मिंदेपणा येतोच,  हे वास्तव आहे. म्हणून , बातमीतले सत्य सांगून, समाजाच्या वेदनेवर आपणाला बोट ठेवता येईल, याचा विचार करण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी सांगितले. साप्ताहिक, अर्ध साप्ताहिकाचे मूल्य वाढण्याची गरज आहे. अंकाला येणारा खर्च आणि वृत्तपत्र विक्री चे मूल्य, यामध्ये खूप तफावत आहे. याचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त करून, त्यांनी सांगितले की, स्व.भोसले यांच्या सारखा तरूण पत्रकार कोरोना सारख्या आजाराच्या भितीचा बळी ठरला. चार पत्रकारांचे कोरोना महामारीने बळी घेतला असून, राज्य सरकारने पत्रकारांना पन्नास लाख रुपयांची विमा योजना जाहीर करावी म्हणून, आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले आहेत. त्याला यश मिळाले आहे. तरीही, सरकारच्या काही जाचक अटी शिथील करण्यासंदर्भात आमचा पाठपुरावा सुरू आहे. सरकारने पत्रकारांच्या बाबतीत लवचीक भूमिका घेऊन, त्यांच्या कुटुंबाला आधार मिळवून देण्यासाठी नेटाने आपण प्रयत्न करणार असल्याचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे यांनी शेवटी बोलताना सांगितले. 
यावेळी पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment