तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 August 2020

पेठशिवणी ग्रापंचायतीच्या विकास कामांचा लेखा -जोखा पुस्तकं प्रकाशित


 
 आरूना शर्मा


पालम :- तालुक्यातील पेठशिवणी ग्रामपंचायतीचे सरपंजानी पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा अहवाल पुस्तक रूपाने जनतेसाठी प्रकाशित करून कौतुकास्पद कार्य केले, असे प्रतिपादन सखाराम कुंभार यांनी व्यक्त केले. पेठशिवणी ग्रामपंचायतीचे सरपंचाची पाच वर्षाची मुदत संपली त्यानिमित्ताने सरपंच प्रतिनिधी आनंता करंजे यांचा ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित अंबादास जोशी तर सत्कारमूर्ती म्हणून सरपंच प्रतिनिधि अनंतराव करंजे, प्रमुख पाहुणे म्हणून सखाराम कुंभार सर, परभणी माजी जि.प. सदस्य विनायक वाडेवाले, रुपेश शिनगारे, बालाजी बरडे, भाऊराव मेहेत्रे सर आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा जनतेसमोर पुस्तकाच्या रूपाने मांडणारी ग्रामपंचायत ही परभणी जिल्ह्यातील एकमेव असेल तसेच पाच वर्षाच्या कार्यकाळात सरपंचानी विकासाची चांगली कामे केली असून पुस्तकाच्या रूपाने लेखाजोखा मांडण्याचे कार्य हे समाजासाठी आदर्शवादी व कौतुकास्पद आहे. यानंतर माजी जि.प.सदस्य विनायकराव वाडेवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सरपंचाचे कार्य खूप छान असून त्यांच्या कार्यकाळात मी मजूर संस्थेच्या माध्यमातून सिमेंट रस्त्याचे काम केले. सत्कार मूर्ती असलेले सरपंच प्रतिनिधि आनंता करंजे म्हणाले की मला पाच वर्षांच्या कार्यकाळात गावच्या जनतेची विकास कामाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली जनतेने माझ्यावर पाच वर्ष आपुलकीचे प्रेम व सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भगवान करंजे यांनी केले तर आभार प्रभाकर शिनगारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष बाबुराव करंजे, उपसरपंच बाबुराव शिनगारे, बाबुराव वाडेवाले, रमेश शिनगारे, उत्तमराव करंजे, नारायण वाडेवाले, एकनाथ शेठे, श्रीनिवास मेहत्रे, अनंतराव गीजे, धनंजय करंजे, नागोराव भालेराव, विठ्ठल पळसकर सर, शिवाजी पालमकर, विठ्ठल करंजे, दत्तराव गोरकर, राजेश्वर करंजे, बालाजी रामराव बर्डे, शेख मगदूम, सय्यद सय्यदु आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a comment