तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

जिल्हा कृषी अधीक्षक व्ही. एम. मिसाळ यांची परळी तालुक्यातील विविध ठिकाणी पीक पाहणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
आज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ  यांनी परळी तालुक्यातील विविध ठिकाणी पिकांची पाहणी केली . पिकावरील किड व रोगाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मलनाथपुर येथे गंगाधर गुळवे यांच्या शेतात कापूस पिकाची पाहणी करताना कापसा वरील पांढरी माशी आणि गुलाबी बोंड अळी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी  नियमित निरीक्षण करून योग्य औषधाची फवारणी करावी. फेरोमन ट्रॅप शेतात लावून त्याचे निरीक्षण करावे, फवारणी करताना आरोग्याची काळजी घ्यावी सुरक्षा किट चा वापर करावा यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पुढे पिंपळगाव गाढे येथे बापूराव कराड यांच्या शेतावर घरघुती सोयाबीन बियाचे बीबीएफ तंत्रावर पेरणी  पिकाचे सर्व्हेक्षण करताना उपस्थित शेतकऱ्यांना  बी बी एफ या पेरणी तंत्राचा शेतकरयांना उत्पादन वाढण्यास आणि  इतर शेती कामे सोयीस्कर होण्यासाठी खूप उपयोग असून सर्वांनी इथून पुढे याच तंत्राचा उपयोग करावा आणि उत्पादन वाढवावे. तसेच पुढील हंगामात  सोयाबीन बियाणे शेतकर्यांनी स्वतः घरच्या घरी तयार करावे यासाठी कृषी विभागाचे सहकार्य आपल्याला मिळेल असे सांगितले. शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे तयार करण्यासाठी आतापासून कामाला लागावे असे मार्गदर्शन पर सांगितले. सिरसाळा येथे कृषी सहायक शिंदे मॅडम सोबत कापूस पिकाची पाहणी करून किड व रोग यावर मार्गदर्शन केले.  यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे , पर्यवेक्षक चंद्रकांत अप्पा थोंटे , कृषी सहायक वाय एम हाडबे, मिरा टोंम्पे, लिंबकर मॅडम, आणि पोखराचे समूह सहायक हनुमंत चोले उपस्थित होते.

No comments:

Post a comment