तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 August 2020

अण्णाभाऊ साठे जन्म शताब्धी वर्षानिमित्त विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व ना.मुंडे यांना सुपूर्द


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  अण्णाभाऊ साठे जन्म शताब्धी वर्षानिमित्त विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजयजी मुंडे, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत देण्यात आले. तहसीलदार बिपीन पाटील यांना आज दि.०४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात देण्यात आले. या निवेदनावर युवा नेते अनंत इंगळे, संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड चे ता.अध्यक्ष देवराव लुगडे,   शिक्षक लक्ष्मण वैराळ, फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, जितेंद्र मस्के, अमर रोडे, तांदळे, ऍड. कपिल चिंदालिया, बापू गायकवाड, आकाश देवरे आदींच्या स्वाक्षरी आहे. या निवेदनात सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊ साठेंचे महाराष्ट्राच्या साहित्य, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्रात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अतिशय मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांचा शासनस्तरावर गौरव म्हणून पुढील मागण्या मान्य कराव्यात ही विनंती. 1) अण्णाभाऊ साठेंची भारतरत्न साठी महाराष्ट्र शासनाकडून शिफारस करणे. 2) महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे निवडक वाड्.मय प्रकाशित केले आहेत. परंतु त्यामध्ये केवळ 20 कादंबर्‍याच आहेत. तेव्हा जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊ साठेंचे संपूर्ण समग्र वाड्.मय प्रकाशित करावे. 3) शंकरभाऊ साठेंनी लिहलेले माझा भाऊ अण्णाभाऊ हे अण्णाभाऊंचे चरित्र प्रकाशित करावे. 4) अण्णाभाऊंच्या कादंबर्‍यांवर 8 चित्रपट निघलेले आहेत. जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे सर्व चित्रपट दूरदर्शनवर दाखवावेत.  5) अण्णाभाऊं साठेंचा  जन्मदिन  १ ऑगस्ट हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करावा. ६) अण्णाभाऊंच्या कथा, काव्य हे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करावे. ७) अण्णाभाऊंच्या कादंबर्‍या विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ठ कराव्यात. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a comment