तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

लग्नाचे खोटे आमीष दाखवून तरुणीचे अपहरण ; परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- तालुक्यातील धारावती तांडा येथून लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका तरुणीचे अपहरण केले असल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गावातीलच आठ जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परळी तालुक्यातील धारावती तांडा येथून दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणीस लग्नाचे खोटे आमिष दाखवून गावातीलच विष्णू राठोड, यशवंत प्रेमदास पवार, शांताबाई काशिनाथ राठोड, दशरथ राजाराम राठोड, शेवंता दशरथ राठोड, राहुल दशरथ राठोड, कृष्णा दशरथ राठोड, आणि वनिता अनिल राठोड यांनी अपहरण केले. गेली पंधरा ते वीस दिवसांपासून अपहरण झालेल्या मुलीचे वडील विजयकुमार गोविंद राठोड आपल्या मुलीसाठी प्रयत्न करीत आहेत परंतु अरोपितांनी त्यांना जराही मुलीबाबत थांगपत्ता लागू दिला नाही.
      शेवटी अपहरण झालेल्या मुलीचे वडील विजयकुमार गोविंद राठोड राहणार धारावती तांडा तालुका परळी यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांना भेटून झालेल्या घटनेची माहिती दिली. पुरभे यांनी क्षणाचाही विलंब न करता झाल्या घटनेची शहानिशा करून गु. र. नंबर २४९/२०२० कलम ३६३, ३६६, ३४ नुसार वरील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नायक केकान करीत आहेत.

No comments:

Post a comment