तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 August 2020

सर्व माध्यमाच्या शाळा एकदाच सुरू करा- ईसा संघटनेची मागणी..

शांताराम मगर प्रतिनिधि वैजापुर.
 
 कोरोणा महामारी सुरू असल्याने सर्वत्र शाळा मार्च महिन्यांपासून बंद आहे. यामुळे खाजगी इंग्रजी शाळा संस्थाचालक, शिक्षक, स्कूल बस डायवर आर्थिक अडचणीत सापडले आहेत मात्र कोरोणा धोका लक्षात घेवुन शासनाचे पुढील आदेश येई पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांनी घेतला आहे मात्र शासनाचे आदेश नसताना काही जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यात आल्या आहेत यामुळे पालकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तसेच विद्यार्थीचे आरोग्य धोक्यात आणणे योग्य नाही. सर्वत्र कोरोणाचे सक्रिय रूग्ण संख्या वाढली आहे असे असतांना जिल्हा परिषद च्या काही शाळा सुरू करण्यात आल्या असे असेल तर याचा विचार करून सर्व शाळा एका न्याया प्रमाणे त्यामुळे खाजगी शाळा देखील सुरू करण्यात याव्यात अन्यथा सर्व माध्यमाच्या शाळा एकदाच सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभाग यांनी घ्यावा .तसेच नियम मोडुन बेशिस्तपणा करून समाजात संभ्रम निर्माण करणारयावर आपत्ती व्यवस्थापन कायदयाअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन खाजगी इंग्रजी संस्था चालक संघटना ईसा च्या वतीने वैजापुर गट शिक्षण अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर दिगंबर गायके, संतोष सुर्यवंशी,राहुल गायकवाड, कैलास कदम, प्रमोद विशंभर, गंगाधर उगले,योगेश सोनवणे, व्ही. एस. कदम,सोमनाथ थोरात आदी संस्थाचालकांच्या सह्या आहेत 

●●प्रतिक्रिया ●●
शिक्षण हा प्रत्येक विदयार्थाचा मूलभूत अधिकार आहे मात्र कोरोणा धोका लक्षात घेवुन आम्ही शासनास सहकार्य करत आहोत त्यामुळे प्रशासनाने सर्व माध्यमाच्या शाळा एकदाच सुरू करणे बाबतीत योग्य वेळी निर्णय घ्यावा. व नियम तोडणार्यावर अधिकारी वर्गाने योग्य कारवाई करावी 
संतोष सुर्यवंशी तालुका अध्यक्ष ईसा

No comments:

Post a comment