तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 August 2020

गेवराईत शतायु हॉस्पिटल येथे आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक शाखेचा शुभारंभ

सुभाष मुळे
--------------
गेवराई, दि. २७ _ कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातुन राज्यभर सर्वत्र "आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक" सुरु करण्यात येत असून बीड जिल्ह्यातील पहिली शाखा ही गेवराई येथील शतायु हॉस्पिटल येथे सुरू होणार असून दि. २८ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून संपन्न होणार असल्याची माहिती शतायु हॉस्पिटलचे संचालक डॉ.गणेश फलके यांनी दिली.
        सर्वत्र पसरत असलेल्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातुन राज्यभरात हे आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक" सुरु करण्यात येत असून बीड जिल्ह्यातील पहिल्या शाखेची सुरुवात ही गेवराई येथील शतायु हॉस्पिटल येथे दि. २८ रोजी दु. ३ वाजता होणार असून यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम,  जिल्हाध्यक्ष डॉ.अजित जाधव, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर यांच्यासह आदींच्या उपस्थितीत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हा शुभारंभ संपन्न होणार असल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांना कळविण्यात आली आहे. "आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक" मध्ये  प्रत्येकाचा इम्युनिटी स्कोअर म्हणजे  रोग प्रतिकार क्षमता निर्देशांक तपासला जाणार आहे. या क्लिनिक द्वारे  इम्युनिटी स्कोअर नुसार आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारावयाचे सकारात्मक बदल, आरोग्यदायी आहार, विहार , व्यायाम, योग व मानसिक संतुलन समुपदेशन केले जाणार आहे. 
      आपल्या कुटुंब, परिचित, आरोगेच्छुक सहकारी यांना "इम्युनिटी स्कोअर" जाणुन घेण्याविषयी अवगत करा व स्वस्थ आत्मनिर्भर भारत उभारणीत सहभागी व्हा असे आवाहन शतायु हॉस्पिटलचे संचालक डॉ.गणेश फलके यांनी केले आहे.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment