तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 20 August 2020

परळी शहरात पर्यावरणपुरक गणेशमुर्ती उपलब्ध

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
यावर्षी गणेशोत्सवावर कोरोना संकट असल्याने विसर्जनाचा तसेच प्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला असून परळी शहरात लाल माती पासुन बनवलेल्या आकर्षक गणेशमुर्ती सौ.दीपा बंग व सौ. प्रिया सारडा यांनी उपलब्ध केल्या आहेत.
पीओपी व कृत्रिम रंगापासून बनविलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदुर्षण होते. यामुर्ती पाण्यात पुर्णपणे विरघळत नसल्याने मुर्तीची विटंबनाही होते. यामुळे गणेशभ्नतांच्या श्रध्देस तडा जातो. मातीपासुन बनविलेल्या गणेशमूर्तीपासून पर्यावरणाला कसलाही धोका होत नाही. परळी शहरातील बाहेती ऑफिसेटच्या बाजूस सौ.दिपा बंग व सौ.प्रिया सारडा यांनी लाल मातीपासून बनविलेल्या 8, 10, 12 व 18 इंच साहिजच्या गणेशमुर्ती विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. ना नफा ना तोटा या तत्तवांवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून गणेशमूर्ती घेण्यासाठी मों.नं.9423143671, 9422964366, 9421424665 या क्रमांकांवर संपर्क साधवा असे आवाहन सौ.बंग व सौ.सारडा यांनी केले आहे.

No comments:

Post a comment