तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

भारतीय संविधानाचा अपमान केल्याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा


वंचित बहूजन आघाडीचे ठाणेदाराला निवेदन


मंगरूळपीर-भारतीय राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे मात्र प्रवीण तरडे यांनी भारतीय संविधानावर गणपतीची मूर्ती ठेवून स्थापना केली आहे भारतामध्ये धर्मनिरपेक्ष धार्मिक कार्यक्रमात राज्य घटना वापरता येत नाही तरीसुद्धा जाणीवपूर्वक भारत देशाचा व संविधानाचा अपमान केला आहे शिवाय कायद्याने सुद्धा चुकीचे असतांना संविधान प्रतिमेचे गणपतीचे पाट समजून तरडे यांनी भारतीय संविधानाचा गैरवापर केला त्यामुळे प्रवीण तरडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील पोलिस स्टेशनला दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे केली आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सौरभ सपकाळ,समाधान भगत,गजानन इंगोले,गौतम खाडे,जनार्दन बेलखेडे,गौतम मनवर,भगवान भगत,दिलीप सोनवणे,आनंदा भगत,सुमित इंगोले हे उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment