तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 August 2020

कर्तव्यावरील पोलिस बांधवांना यंग सिटिझन टिमच्या मुलींनी बांधल्या राख्या

ड्युटीस्पाॅटवर राख्या बांधल्याने पोलिसही भारावले


मंगरुळपीर(फुलचंद भगत)-रक्षाबंधन हा सण बहीणभावाचे अतुट नाते घट्ट करणारा एक अमुल्य दिवस असुन कोरोणाच्या काळात आपले वैयक्तीक आयुष्य विसरुन शांतता व सुरक्षितता ठेवन्याचे कर्तव्य पोलिस बांधव पार पाडत अाहेत त्यामुळे रक्षाबंधनासारख्या या पविञ सणालाही ते घरी न जावु शकल्याने यंग सिटिझन टिममधील मुलींना कर्तव्यावरील पोलिसबांधवांना राखी बांधुन  बहीणीचे कर्तव्य निभावल्याने पोलिसही भारावुन गेलेत.
             जनतेच्या सुरक्षा आणी शांततेसाठीसाठी अहोराञ कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना प्रसंगी आपले वैयक्तीक आयुष्यही विसरुन कर्तव्य बजावावे लागते.यादरम्यान सण ऊत्सवालाही ते आपल्या कुटुंबियासमवेत ऊपस्थीत न राहता सर्वांच्या सुरक्षिततेची धुरा पोलिस सांभाळत अाहेत.सध्या सर्वञ कोरोणाने थैमान घातल्याने बहूतांश ठिकाणी लाॅकडाउनही आहे.अशातच पोलिसांना महत्वाची भुमिका बजावावी लागत असल्याने रक्षाबंधनासारख्या पविञ समजल्या जाणार्‍या सणालाही ते आपल्या बहीणीकडे राखी बांधायला जावू शकले नाहीत.परंतु ही ऊणीव भरुन काढत मंगरूळपीर येथील यंग सिटिझन टिमच्या मुलींनी कोरोणाच्या काळातही आपले कर्तव्य बजावणार्‍या पोलिसबांधवांच्या त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जावुन रक्षा शर्मा,प्रगती भाकरे,आरती चव्हाण यांनी राख्या बांधल्या.यावेळी यंग सिटिझन टिमचे सुचित देशमुख,मयुर पाटील,अनुप इंगळे,फुलचंद भगत यांचीही ऊपस्थीती होती.महिलाभगीणीची सुरक्षा करणारे पोलिस यांना या मुलींनी राख्या बांधल्यामुळे ते सुध्दा भारावुन गेले असुन आम्हच्या कुटुंबियांची व बहीणीच्या अतुट नात्याची ऊणीव या मुलींनी राखी बांधुन भरुन काढल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.एकीकडे पोलिसांमधील दोष काढणारे लोक दिसतात तर दुसरीकडे याच पोलिसबांधवांनाही आपले वैयक्तीक आयुष्य असते,त्यांनाही कुटुंबियासमवेत सुखाचे क्षण या सणऊत्सवाला घालवायचे असते परंतु लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कुटुंबियांना प्रसंगी भेटताही येत नाही पण अशाप्रकारे समाजमन जोपासणार्‍या संघटनाही पोलिसांसाठी कार्य करतात त्यामुळे पोलिसांनाही कर्तव्य बजावन्यामध्ये नविन ऊर्जा मिळते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment