तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 1 August 2020

येवल्यात आरपीआयच्या वतीने दूध दरवाढसाठी अनोखे आंदोलन..........दुधाचा  काढा करून केले मोफत वाटप....

प्रतिनिधी.संतोष बटाव येवला

येवला (नाशिक ) :- येवल्यातील तळवाडे गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) यांच्या वतीने दूध दरवाढीसाठी अनोखे आंदोलन करण्यात आले .यावेळी दूधाची कोणत्याही प्रकारची नासाडी न करता दुधाचा काढा तयार करून हे दूध मोफत वाटप करून हे आगळेवेगळे आंदोलन आरपीआय चे जिल्हा सरचिटणीस संजय पगारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी गाईच्या दुधाला 10 रुपये प्रति लिटर अनुदान द्या तसेच दुध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे तसेच दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव द्यावा अशी मागणी यावेळी आरपीआय व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
 दूध उत्पादकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार प्रतिलिटर दुधाचा भाव 25 रुपये म्हणत आहे. मात्र, तो भाव दूध उत्पादकांना कुठेही मिळत नाही. कोणतीच संस्था भाव देत नाही अगदी 15 ते 20 रुपये भाव मिळतो. त्यामुळे सरकारने दूध उत्पादकांना 10 रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे,तसेच दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव द्यावा  ही मागणी यावेळी करण्यात आली .जर या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आरपीआय (आठवले गट) चे जिल्हा सरचिटणीस संजय पगारे यांनी दिले आहे.

No comments:

Post a comment