तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 19 August 2020

कापसाच्या पिकाची वन्य प्राण्यांकडून नासधूस


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील तडोळी येथील शेतकरी संपत सातभाई यांच्या शेतातील कापासाची वन्य प्राणी यांनी उध्वस्त केल्याची घटना घडली आहे. 
       याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील सध्या पाऊसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे पिके ही चांगले आले आहेत. परंतु शेतकऱ्यांना कुठल्याही गोष्टींचा नेहमीच सामना करावा लागत आहे. तालुक्यातील तडोळी या परिसरातील शेतकरी संपत सातभाई यांच्या शेतातील जोमात आलेले कापसाचे पीक वन्य प्राणी यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगोदर शेतकरी कोरोना संकटामुळे संकटात सापडला आहे. त्याच हा प्रकार झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई घावी अशी मागणी सातभाई यांनी केली आहे.

No comments:

Post a comment