तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

सेनगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा-युवासेनेची मागणी


हिंगोली/प्रतिनीधी

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसापासून पाऊस संततधार कोसळत आहे परीणामी हाता-तोंडाशी आलेले पिके पिवळी पडुन जागीच सडून जात असल्याने धोक्यात आली आहे.शेतकरी बांधवाच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या मागणीचे निवेदन आज दि.२१ आँगष्ट शुक्रवार रोजी दूपारी सेनगांवचे तहसिलदार जिवकुमार कांबळे यांना युवासेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
सेनगांव तालुक्यात यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांनी महागामोलाचे बियाणे व खते खरेदी करुन पेरण्या केल्या परंतु काही नामांकीत सोयाबीन बियाणे उगविलेच नाही त्यामुळे शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली तर काही शेतक-यांना तिबार पेरणीसुध्दा करावी लागल्याने शेतकरी पहिलाच आर्थिक संकटाशी सामना करीत असतांना आता गेल्या दहा-बारा दिवसापासुन संततधार पाउस कोसळत असल्याने या अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेले मुग,उडीद,सोयाबीन,कापुस,ज्वारी ही पिके पिवळी पडत आहेत या नैसर्गिक संकटाने बळीराजा पुरता अडचणीत आला आहे. तरी तहसिल कार्यालयामार्फत बाधीत शेतकर्‍यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन सेनगांव तहसिलदार जिवकुमार कांबळे यांना हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल अगस्ती,सेनगांव युवासेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे-पाटील,राजु देशमुख,सुनिल वाघमारे,सचिनभैया जाधव आदी युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांनी दिले आहे.

No comments:

Post a comment