तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

पोलीस निरिक्षकास निलंबित करण्याची मागणी


प्रतिनिधी
पाथरी:-पाथरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालाजी टिपलवाढ यांनी तिरस्काराच्या भावनेतून बौध्द आणि मातंग समाजा बद्दल असभ्य भाषा बोलून  समाजाच्या भावना दुखावल्या मुळे या अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागासवर्गी विभागाच्यावतीने पाथरीचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्याकडे दिनांक २१ ऑगस्ट रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रात्री पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी तीपालवड यांनी दिनांक १२ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या सोबत निवेदन स्वीकारण्याच्या कारणा वरून काहीतरी हुज्जत झाली त्यानंतर पाथरी पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी ट्रिपलवाढ हे एका अज्ञात इसमाचा मोबाईल वरती वार्तालाप करताना व सदरील घटनेची माहिती देत असताना असभ्य भाषा बोलून मागासवर्गीय समाजाबद्दल अतिशय सूड भावनेतून व तिरस्काराच्या भावनेतून महार, मांग साले असा अपमानजनक शब्दप्रयोग केल्यामुळे मातंग व बौद्ध समाजाच्या सामाजिक भावना दुखावल्या आहेत सदर ऑडिओ क्लिप ही सोशल मीडिया मार्फत व्हायरल झालेली आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलच्या वतीने दिनांक २१ ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी ट्रिपलवाढ यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनावर मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष उत्तम झींझुर्डे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख खालेद,नगरसेवक सतीश वाकडे,नगरसेवक अजयसिंह पाथ्रीकर,राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष गुलाम मुस्तफा अन्सारी, बंडू जनार्धन कांबळे, शेख इरफान, ज्ञानदेव पैठने, राहुल गौतम वाकडे रहीम अन्सारी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a comment