तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्ट आशोक राऊत.....!

शांताराम मगर प्रतिनिधि वैजापुर 

कोरटेवा (पायोनियर बियाणे) कंपनी तर्फे वैजापूर येथे मका पेरणी यंत्राचे वितरण करण्यात आले.
देण्यात येणाऱ्या पेरणी यंत्राच्या साहाय्याने शेतकरी बंधू आपल्या भागातील मका पिकाची पेरणी करतात.
यंत्राच्या साहाय्याने बियाणे योग्य अंतरावर पेरण्यास मदत होते तसेच मनुष्यबळ व वेळेची देखील बचत होते. हे आम्ही आमची शेतकरी समुदयाबद्दलची सामाजिक जबाबदारी म्हणून करत आहोत.आसे आशोक राऊत यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांनी कोरटेवा कंपनी च्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले. शेतकरी बंधूंना पेरणी यंत्राचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन मका उत्पादन वाढवण्याचे आव्हाहन केले.
त्यावेळी पायोनियर कंपनीचे अधिकारी अशोक राऊत वैजापूर विभाग अमोल कटारे व पंकज संतपाल लाभार्थी शेतकरी-अशोक सोनवणे.गणेश कुंदे.दिपक ठुबे .अरूण पवार .बाळू जगताप. वसंत कटारे.बाबासाहेब वैद्या .लक्ष्मन हागवणे. बाळू इंगळे.दिपक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना म्हणाले रुंद वरंबा सरी पध्दतीचा प्रमुख उद्देश म्हणजे पावसाचा खंड पडल्यास जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतो. जास्त पावसाच्या कालखंडात पाण्याचा योग्य निचरा होऊन पिकात पाणी साचत नाही. या लागवड तंत्रासाठी बीबीएफ टोकण यंत्र फायदेशीर ठरते.
रुंद वरंबा सरी पद्धतीने, मका ई प्रमुख पिकांची लागवड करता येते. रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केल्याने सरीद्वारे पावसाच्या पाण्याचे संवर्धन तसेच निचरा झाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते. पीक उत्पादनात वाढ मिळते. या तंत्रासाठी ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.
सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्ट 
प्रमुख पिकांच्या पेरणीसाठी सुधारीत यंत्राचा वापर केल्यास श्रम आणि कष्टासोबत पेरणी खर्चातही बचत होते. 
पारंपरिक पेरणी पद्धतीमध्ये शेतकरी एक चाड्याची पाभर प्रामुख्याने वापरत असे. त्यातून बियांची पेरणी होत असली तरी खतांची मात्रा अंदाजाने शेतात फेकुन दिली जाते यातही हाताने बी सोडले जात असल्याने कमी अधिक प्रमाण होण्याची शक्यता असे. पुढे एका चाड्याच्या पाभरीऐवजी दोन चाड्याच्या पाभरीचा पर्याय पुढे आला. या दुसर्‍या चाड्याद्वारे जमिनीमध्ये खत पेरून दिले जाई. खत बियांच्या जवळ मातीमध्ये खाली पेरून दिल्यामुळे उत्पादनामध्ये 10 ते 15 टक्के वाढ मिळू लागली. अर्थात दोन चाड्याच्या पेरणीमध्ये खत आणि बी पेरणीसाठी अनुभवी, कुशल माणसांची आवश्यकता असे. पूर्वी ही पाभर बैलाच्या साह्याने चालवली जाई. बैलचलित पाभरीने अंदाजे 2 ते 3 एकर पेरणी शक्य होते.
तसेच पीक उगवल्यानंतर विरळणी किंवा पुनर्लागवड मजुरांच्या साह्याने करावी लागते. अलीकडे मजुरांचा उपलब्धता कमी झाल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्याचप्रमाणे केवळ मशागत आणि पेरणीसाठी बैल सांभाळणे जिकिरीचे होत असल्याने बैलांचे प्रमाण गावपातळीवर कमी झाले आहे. ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्रणांचा वापर वाढला आहे. या यंत्रामुळे आठ तासामध्ये 6 ते 7 एकरपर्यंतची पेरणी शक्य आहे. वरील शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन सुधारित अवजारे व यंत्रे विकसित केली आहेत.
या यंत्राद्वारे मका, भुईमूग, हरभरा पिकाची पेरणी करता येते. 
कडेला वळताना बी व खत बंद करण्यासाठी जमिनीवर चालणारे चाक उचलावे लागते. त्यासाठी यंत्र हायड्रॉलिक कंट्रोल लिव्हरच्या साहाय्याने उचलावे लागते.त्यानंतर वळण घेऊन हायड्रॉलिक कंट्रोल लिव्हरने यंत्र खाली घेऊन पेरणी करता येते.
बहुतांश शेतकऱ्यांकडे बैलचलित बळीराम नांगर आहेत. तसेच बैलचलित तिफण वापरून शेतकरी पेरणी करतात. या दोन अवजाराने सुध्दा रुंद वरंबा सरी पद्धतीसारखी पेरणी करता येते.
रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचे फायदे .
रासायनिक खतांची उपयुक्तता वाढते.
ठरावीक ओळीनंतर सरी तयार होत असल्याची पावसाचे पाणी सरीत थांबते, जमिनीत मुरते.
जमिनीची धूप कमी होते. पाणी सरीत टिकून राहिल्याने पिकांचे नुकसान टळते.
पावसाचे पाणी पिकात न साचता आवश्‍यक तेवढे सरीत थांबून जास्तीचे पाणी बाहेर निघून जाते. त्यामुळे अतिवृष्टीचा पिकावर विपरीत परिणाम होत नाही.

No comments:

Post a comment