तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 August 2020

नंदनज ग्रामपंचायतीचा आदर्श इतर गावांनी घ्यावा-राजेश गित्ते


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत दादाहारी वडगाव जिल्हा परिषद सर्कलमधुन नंदनज ग्रामपंचायतीने 50,000 रुप्यांचे प्रथम प्रारितोषिक पटकावले त्यानंतर भाजपाचे नेते राजेश गित्ते यांनी सरपंच अनिल गुट्टे यांचा सत्कार केला. यावेळी बोलतांना यांनी तालु्नयातील इतर गावांनी नंदनज ग्रामपंचायतचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.
पंचायत समितीच्या सभागृहात भारतीय स्वतंत्र्य दिनाचे औचित्य साधुन नंदनज ग्रामपंचायतीला स्वच्छता अभियानातील दादाहारी वडगाव गटातुन प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  त्यानंतर आज दि.24 ऑगस्ट रोजी राजेश गित्ते यांनी सरपंच अनिल गुट्टे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा सरचिटणीस रवि कांदे, महादेव मुंडे बापु आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment