तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 August 2020

येलदरी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधि करणार आंदोलन


येलदरी धरणाच्या मुळ गावात मारोती मंदिरात नारळ फोडून आंदोलनाची सुरुवात

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव :- तालुक्यातील मुळ गांव असलेल्या येलदरी येथे मारोती मंदिरात गांवकऱ्यांच्या उपस्थितित नारळ फोडण्यात आले आहे. लवकर  आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे उपस्थितांसमोर उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी सांगितले.

येलदरी धरणातुन डावा कालवा काढण्यात यावा यासाठी संपूर्ण तालुक्यातुन मागणी होऊ लागल्याने तालुक्यातील बहुतांश नागरिक आता आंदोलनाच्या तयारित आहेत. सोशलच्या माध्यमातून बऱ्याच पोस्ट फिरल्यानंतर शिवसेनेने सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे निवेदना द्वारे मागणी केली आहे. येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधि एकत्र येऊन लढा देतील अशी आशा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे. 

तर इकडे शिवसेनेने मात्र असंख्य कार्यकर्त्यांसह तालुक्यातील येलदरी गावात जाऊन नागरिकांची भेट घेतली व या मागणी संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला यावेळी गावातील मारोती मंदिरात नारळ फोडण्यात आले व पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले. या धरणातुन आपल्या तालुक्यामध्ये कालवा काढण्यात आला तर शेकडो हेक्टर कोरडवाहू जमीनी पाण्याखाली येऊन जनतेचे कल्याण होईल असा आशावाद शिवसेनेने व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेशराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायनबाबा राठोड, प्रवीण महाजन, माजी पंचायत समिती सदस्य गणेश राठोड व गावकरी बांधव उपस्थित होते.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment