तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 August 2020

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या मराठा शिवसैनिकांनाची मागणी

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

मराठा शिवसैनिक सेने च्या वतीने तहसीलदार साहेबांना देण्यात आले निवेदन 
सेनगाव तालुक्यात झालेल्या लगातार 15 दिवस अतिवृष्टी  पावसामुळे एक हजार  हेक्टर हुंन अधिक सोयाबीन तूर उडीद मूग इत्यादी पिकांचे खुप नुकसान झाले आहे. या वर्षी शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला उडीद मुग पूर्णपणे पाण्यामुळे खराब झालेला आहे तर सोयाबीन वर आता नवीनच ॲन्थ्राँकानोज वायरचा  परिणाम  दिसून येत आहे या व्हायरसमुळे सोयाबीनचे शेंगा गळणी पाने पिवळी होणे फुल गळणी इत्यादी परिणाम दिसून येत आहे करिता कृषी विभागाकडून कृषी अधिकारी यांनी पूर्ण सेनगाव तालुक्यातील शेत शिवाराचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान जाहीर करण्याचे तहसीलदार साहेबां कडे मागणी केली आहे या करिता 
मराठा शिवसैनिक सेने चे शेतकरी जिल्हा प्रमुख गजानन देशमुख पानकनेरगाव व तालुका  प्रमुख बालाजी भिसे तालुका शेतकरी तालुका सरचिटणीस अंकुश देशमुख शेतकरी तालुका उप अध्यक्ष विशाल गवळी पिंटू देशमुख सेनगाव महादेव हरण व शेख मुराद  इतर मान्यवर उपस्थित होते

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment