तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

खा.प्रितमताई मुंडे यांनी केले पवार,भोसले कुटुंबीयांचे सांत्वन

बीडचे निवृत्त मंडळ अधिकारी शेख जहांगीर यांच्या कुटुंबीयांची ही घेतली भेट

गेवराई (प्रतिनिधी) :- दि.२१----बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी काल ( दि.२१ ) गेवराई येथे भेट देऊन भाजपचे गेवराई तालुका विस्तारक ईश्वर पवार यांचे वडील स्व.भाऊराव पवार व पत्रकार स्व.संतोष भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.याप्रसंगी त्यांच्यासोबत गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेवराई तालुक्यातील रोहीतळ येथे भेट देऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी ईश्वर पवार व त्यांच्या  कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन पवार कुटुंबाला आधार दिला.गेवराई शहरातील पत्रकार स्व.संतोष भोसले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते,भोसले यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.खा.प्रितमताई मुंडे यांनी पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.तसेच गेवराईचे नगरसेवक राजाभाऊ आर्दंड यांच्या घरी भेट देऊन आर्दंड यांच्या मातोश्रींच्या निधनावर शोक व्यक्त केला.याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे,उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर,बंडू बारगजे होते.

तर बीड येथे भाजप नेते सलीम जहांगीर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी जहांगीर कुटुंबाचे सांत्वन केले.शेख जहांगीर साहेब हे निवृत्त मंडळ अधिकारी होते.कुटुंब वत्सल व सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्यासह रमेश पोकळे व भाजपचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

No comments:

Post a comment